Subject: Extension of Deadline for Submission of Secondary Certificate (10th Grade) Applications for February-March 2026 Examinations This is to inform all concerned that an extension has been granted for the submission of online applications for the Secondary Certificate (10th Grade) examinations scheduled for February-March 2026. The updated deadline is specified in the notice regarding the extension of the application period. All candidates are advised to complete their applications within the revised timeframe to ensure eligibility for the upcoming examinations.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
।। प्रकटन ।।
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु. मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च
२०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने
त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट
होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या
तारखांना मुदतवाढ देण्यात येत आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे –
| शुल्क प्रकार | माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच ITI (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा |
| नियमित शुल्क (मुदतवाढ) |
मंगळवार, दिनांक ०७/१०/२०२५ ते सोमवार, दिनांक २७/१०/२०२५ |
| माध्यमिक शाळांनी दिनांक १५/०९/२०२५ ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कRTGS NEFT द्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये “Draft चा “Send to Board” व Payment Status मध्ये “Not Paid ” चा “Paid” असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी. |
शुल्क जमा केलेली RTGS/NEFT पावती/ चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळाप्रमुख/ मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी.
सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य
माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या
कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची
प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी.
सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी
प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक
शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात
घेणे आवश्यक आहे –
१. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची
अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय
उपलब्ध करुन दिलेली आहे.
२. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व
तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी
यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन
पध्दतीने भरावयाची आहेत.
३. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
| माध्यमिक प्रमाणपत्र (इ १० वी ) फेब्रु-मार्च २०२६ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ देणेबाबत |
| PDF View |